पिंपळोली गावा बद्दल माहिती

प्रामुख्याने पुणे शहरापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर खापुरगंगा ओढयाचा लगत पिंपळोली गाव वसलेले आहे. गावाची लोकसंख्या ९०७ एवढी आहे. पिंपळोली गावात साधारण २०० घरे आहेत. संपूर्ण गावातील लोक जरी भिन्न जातीतील असले तरी गावात फक्त एकच जात आहे आणि ती म्हणजे मानवजात. अशा या गावात सर्वजण एकोप्याने, गुण्यागोविंदाने, आनंदाने एकमेकांच्या सुख दुखात सामील होतात. याच एकमेव कारण म्हणजे या गावावर असणारी ग्रामदैवत भैरवनाथची कृपा. तरी गावात सहा मंदिरे आहेत. विठ्ठल-रुख्मिणी व मारुती मंदिर, स्वयंभू महादेव मंदिर(श्री क्षेत्र शेळकेवाडी), दत्त मंदिर, गणेश मंदिर, बापुजी बुवा मंदिर आणि ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर (पिंपळोली)तसेच गावामध्ये अमृत महाराज जोशी यांचा देखील मठ आहे. प्रत्येक देवतेचा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा होतो. गावामध्ये धार्मिक कार्यक्रम मोठ्या हिरिरीने पार पाडले जातात. गावामध्ये अखंड हरीनाम सप्ताह, ग्रामदैवताची यात्रा, कुस्त्या, चैत्रपोर्णिमाकाठी, महाशिवरात्री असे सांस्कृतिक, व पारंपारिक कार्यक्रम अतिशय उत्साहाने पार पडले जातात.

पिंपळोली गावात स्वयंभू शिव शंकराचे मंदिर असून ते जागृत देवस्थान आह़े. गावचे पुजारी अनिकेत काका आहेत. पिंपळोली गावात धार्मिक उत्सव साजरे करण्यात येतात. पिंपळोली गावाचे उपसरपंच बाबाजी शेळके असून ते कर्तव्यदक्ष आहेत. गावात तलाठी कार्यालय व सरकारमान्य रेशनदुकान आहेत. तसेच स्मशानभूमी, २ अंगणवाडया, आहेत. गावात प्रामुख्यान तीन जिल्हापरिषद शाळा आहेत व त्या शाळा प्रगत स्थितीमध्ये असून शैक्षणिकदृष्टया अ व ब श्रेणीत आहे. स्वच्छ शाळा उपक्रम, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्यांचा वापर यासारखे विविध उपक्रम शाळेत राबविले जातात.

गावाच परिक्षेत्र हे ४८७ हेक्टर एवढे अंदाजे असून वनक्षेत्र ७७.०७ हेक्टर एवढे आहे. तसेच लागवडीखालील क्षेत्र हे ३५१ हेक्टर एवढे आहे. गावमध्ये पारंपारिक पद्धतीने व आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. प्रामुख्यान तांदूळ तसेच भाजीपाल्याची पीके घेतली जातात. भवुतांशी शेती करण्यासाठी ठिबक सिंचन वापरले जाते. बागायती पशुपालन, दुग्ध (दही/दुध), खारीक उत्पादन, मोलमजुरी हा या परिसरातील मुख्य व्यवसाय असून या गावातील अनेक मंडळी नोकरी-व्यवसायासाठी मुंबई, पुणे येथे असतात. गावाच्या विकासासाठी सगळ्या गावकारयांचे मोठे योगदान लाभले आहे.

तरी गावामध्ये प्रामुख्यान शेळकेवाडी आणि गवारेवाडी ह्या वस्त्या आहेत, यांमध्ये पिण्याचा पाण्याचा पुरवठा नळपाणी पुरवठा योजने मार्फत होतो.

पिंपळोली गावातील धर्मिक स्थळे

bhairavnath

श्री भैरवनाथ मंदिर, पिंपळोली

mahadev-mandir

स्वयंभू महादेव मंदिर, श्री क्षेत्र शेळकेवाडी

bapujibua-mandir

श्री बापुजीबुवा मंदिर

vitthal-mandir

विठ्ठल-रुख्मिणी व मारुती मंदिर


पिंपळोली गावातील शाळा

gavarevadi-school

जि.प शाळा, गवारेवाडी

achievements-img2

जि.प शाळा, पिंपळोली

achievements-img3

जि.प शाळा, गवारेवाडी

achievements-img4

जि.प शाळा, शेळकेवाडी


पिंपळोली गावातील रस्ते

road1
achievements-img2
achievements-img3
achievements-img4